जे घडलं ते चांगल्यासाठीच .......
जे घडलं ते चांगल्यासाठीच .......
आज , आज काही सुचतच नाही
आठवणींच मळभ डोळ्यांसमोरून हटतच नाही
भंगले हृदय जरी छबी त्याची ढळत नाही
कागदाच्या अंगणी शब्दांचा पाउस पडतच नाही
त्याच्यासाठी बनले त्याला हवी तशी
त्याच्यासाठी झुरल्या किती किती रात्री
स्वाभिमान विसरून झाले लाचार त्याच्यापाई
त्याचा फक्त ध्यास मनी बाकी काही नाही
इतक करून तो कधीही माझा झालाच नाही
बरोबर असून सुद्धा कधी माझा वाटला नाही
हातातला त्याचा हात आधार बनला नाही
वेड्या मनाला त्याचा हेतु कधी कळलाच नाही
काल अचानक त्याला आठवलं काही
म्हणे तुझ्यात marriage material च नाही
खरं "तुझ्या बरोबरचा एकही क्षण bor झाला नाही
पण तुझ्या बरोबर लग्न करायचा बिलकुल विचार नाही"
जाता जाता वळून म्हणे
"टीकवूया आपण मैत्री आपली
अशीच अधून मधून भेट कधी कधी
रोज रोज भेटण आता मला जमणार नाही"
त्याला समजावण मला जमलच नाही
माझ्या शब्दांनी माझी साथही दिली नाही
शिकलेय मी शब्दांशिवायही जगावं लगत कधी कधी
जे घडलं ते चांगल्यासाठीच मानवं लागतं कधी कधी
Wednesday, April 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment