skip to main | skip to sidebar

Scraps 4 Me

Tuesday, May 11, 2010

मीच माझे स्वप्न व्हावे...

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...
Posted by Keerti at 4:54 AM 0 comments

कारण प्रेम करणं सोपं नसतं .....

प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच
नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच nasatan
कारण प्रेम करणं
सोपं नसतं
शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात
पडतं
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं
जागेपणी ही मग प्रेमाचं
स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं
सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर
पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं
लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं
लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक
दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं
एवढ सगळं करणं खुप
कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं ..... ;) -
Posted by Keerti at 4:48 AM 0 comments

.......ती मैत्री

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...!
Posted by Keerti at 4:46 AM 0 comments

थोडा वेळ मिळाला तर

थोडा वेळ मिळाला तर हे नक्की वाच...........आवडेल तुला.

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........
Posted by Keerti at 4:43 AM 0 comments

तुझ मन, माझ मन

तुझ मन, माझ मन एकमेकांशी जुळु दे, मैत्री नावाचं नवं नातं मनी आपल्या रुळू दे.... मैत्री तुझी माझी.... तुझ्या मनाला मझ्या मनाचा रस्ता छान कळू दे मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग ओंजळ पूर्ण भरुदे.... नातं मैत्रीचं मैत्री म्हणजे तुझ मन आपोआप मला कळण मैत्री म्हणजे माझ्या मनाचं नातं तुझ्या मनाशी जुळणं.... मैत्री.... मैत्री म्हणजे, आपल्या विचांरात सतत कुणीतरी येण असतं मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला भरभरुन प्रेम देण असतं.... गंध मैत्रीचा...... मैत्रीचं नातचं नाजूक फुलासारखं अलगत फुलणारं आणि एकदा फुलुन आल की जन्मभर गंध देत झुलणारं....... मित्र... केव्हातरी,कुठेतरी मन होत हळूवारं मित्राकडे उघडतं मगं आपल्या भावनांच दार आपण होत जातो भरुन भरुन व्यक्त समोरची व्यक्ती ऎकत असते तेव्हा आपलच म्हणणं फक्त सलाम मैत्रीला..... मैत्री या शब्दावरचं माझं मनापासून प्रेम आहे आणि तुझसुध्दा अगदी माझ्यासारखं सेम आहे.... बात मैत्रीची... तुझ्याशी मैत्री म्हणजे वेगळीच बात आहे, कारण.. सुख आणि दुःखात आपल्या दोघांची साथ आहे....... चांदण मैत्रीचं... मैत्रीचं
Posted by Keerti at 4:41 AM 0 comments

तुझ्या मैत्रीची सावली....

तुझ्या मैत्रीची सावली....
तुझ्या मैत्रीची सावली....
सावली...
तुझ्या चेहऱ्याची सदैव दिसे नजरेत मला
सावली...
तुझ्या शब्दांची सदैव आठवे भुतकाळ मला
सावली...
तुझ्या हाताच्या स्पर्शाची सदैव जाणवे खांद्यावर मला
सावली...
तुझ्या एका हाकेची सदैव धिर दीई मला
सावली...
तुझ्या हास्याची सदैव हसवी मला
सावली...
तुझ्या सुखाची सदैव आनंदात ठेवी मला
सावली...
तुझ्या दुःखाची सदैव अश्रु देई मला
सावली...
तुझ्या अस्तित्वाची सदैव सोबत नेई दुर मला....
आनंदाचे सारे क्षण एकमेकांकडे हसत बघताना
आयुष्यातले सारे क्षण तुझ्या मैत्रीच्या सावली सोबत जगताना
Posted by Keerti at 4:37 AM 0 comments

मैत्री ही मोठी अजब चीज आहे

मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते
Posted by Keerti at 4:35 AM 0 comments
« Older Posts
Subscribe to: Comments (Atom)

Blog Archive

  • ▼  2010 (70)
    • ▼  May (45)
      • मीच माझे स्वप्न व्हावे...
      • कारण प्रेम करणं सोपं नसतं .....
      • .......ती मैत्री
      • थोडा वेळ मिळाला तर
      • तुझ मन, माझ मन
      • तुझ्या मैत्रीची सावली....
      • मैत्री ही मोठी अजब चीज आहे
      • आई, तू आहेस म्हणूनचं
      • मन म्हणजे मन म्हणजे मन असतं
      • मैत्रीण माझी................
      • कुणासाठी काहीतरी
      • होता एक वेडा मुलगा
      • pratibinb
      • कविता करायला का शिकलो?
      • Yaadon Ke Sahare Dunia Nahi Chalti
      • मुलींचे नखरे सांगा पाहु.....
      • कधी असेही जगून बघा.....
      • अजुनही मला आठवतंय….
      • कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?
      • आई म्हणजे
      • म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही...
      • बालपण देगा देवा ... बालपण देगा देवा .
      • आपली मैत्री
      • आई.... ऐकतेयस ना ग
      • मैत्री अशी होते .........
      • दोस्ती
      • मैत्री की प्रेम ?
      • It's so hard ............
      • साधं सोपं आयुष्य
      • जगण्याची ही ऐटच न्यारी
      • सुकुमार चारोळी
      • मैत्रीचे बंध
      • ओळख
      • ╬♥*******I miss u********♥╬
      • मानसे
      • तो मराठी मुलगा असतो !!
      • :: A Touching Love story ::
      • मी, मराठी
      • बहुत दिन हुए
      • अजुन काय हवे असते
      • मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
      • •♥ मी आहेच असा •♥•
      • मैत्री
      • It's so hard to............
      • frnd
    • ►  April (24)
    • ►  March (1)

About Me

Keerti
My dear friends, these are the favourate scraps sent by my friends to me........ not written by me........... Hope you will also like them............
View my complete profile

Followers

 
Copyright © Scraps 4 Me. All rights reserved.
Blogger templates created by Templates Block
Wordpress theme by Uno Design Studio